कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

मासिक आवर्ती ठेव ( आवर्ती खाते )




ज्यांना ठराविक कालावधीसाठी नियमित बचत करायची असते आणि जास्त व्याजदर हवा असतो, ते आवर्ती ठेव खाते उघडतात. आवर्ती ठेव खात्यात ठराविक रक्कम दर महिन्याला एका विशिष्ट कालावधीसाठी घेतली जाते आणि विशिष्ट मुदतीच्या शेवटी एकूण रक्कम व्याजासह परत केली जाते.



पात्रता

  • बचत खाते आवश्यक.
  • भागधारक आवश्यक.

वैशिष्ट्य

  • मासिक हप्ते कोणत्याही रकमेपासून सुरु करता येतील, किमान रु. १०० /- पासून पुढे.
  • एक खाते १२ महिने ते ६० महिने व यावरील कोणत्याही कालावधीसाठी उघडता येईल.
  • योजनेच्या सुरुवातीला निवडलेली हफ्त्याची रक्कम दरमहा देय असेल.
  • एकदा निवडलेली हफ्त्यांची संख्या, बदलविली जाऊ शकत नाही.
  • मॅच्युरिटी रक्कम मॅच्युरिटी तारीखेच्या वेळेस दिली जाईल.
  • नामनिर्देशनाची तरतूद उपलब्ध.

आवर्ती खाते उघडण्यासाठी प्रारंभिक ठेव रु. १०० /- पासून पुढे.

व्याजदर

व्याज ९.५० % दरसाल,१-५ वर्षासाठी ३ माही उत्पादन पद्धतीने मोजला जाईल. आणि खाते बंद करण्याच्या वेळेस जमा केला जातो.

आर.डी. ठेव व्याज दर
१२ महिने ते ६० महिने ९.५०%

पासबुक

प्रत्येक आवर्ती खात्याच्या ठेवीदाराला त्याचे आवर्ती खाते क्रमांक, त्याचे/तिचे नाव व पत्ता आणि तारखेपर्यंतचे व्यवहार, शिल्लक रक्कम इत्यादींचा तपशील असलेले पासबुक दिले जाईल.

खाते चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • दोन नवीनतम कलर फोटो.
  • राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, चालक परवाना, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, आधार कार्ड इ.).
  • ओळख पत्र.
  • पॅन कार्ड नम्बर व पडताळणीसाठी मूळ पॅन कार्ड आवश्यक.
  • प्रारंभिक ठेव रोख.